Ad will apear here
Next
‘विनोदातील सहजता हरवू नये’
जागतिक हास्य दिनानिमित्त निवारा वृद्धाश्रमात आयोजित बोलताना ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले. या वेळी  व्यासपीठावर (डावीकडून ) सुनीता राजे पवार, ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस

पुणे : येणाऱ्या रसिकाचे काढले जाणारे अर्कचित्र, ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द. फडणीस, मंगला गोडबोले यांची नर्मविनोदी भाषणे, मकरंद टिल्लू यांच्या हास्ययोगाने झालेली हसरी सुरवात, विनोदी कथा लेखक रवींद्र कोकरे यांचे कथाकथन आणि विविध किस्से यामुळे रविवारची सायंकाळ  हास्यकल्लोळात रंगली.

निमित्त होते लायन्स क्लब ऑफ पुणे औंध - पाषाण ,महाराष्ट्र साहित्य परिषद यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘विनोद- साहित्य - आनंद मेळा’  या कार्यक्रमाचे. जागतिक हास्य दिनानिमित्त निवारा वृद्धाश्रमात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

या वेळी व्यासपीठावर  शि. द. फडणीस, मंगला गोडबोले, रवींद्र कोकरे, लायन्स क्लबचे नियोजित प्रांतपाल रमेश शहा, डॉ. सतीश देसाई, प्रा. मिलींद जोशी, मकरंद टिल्लू, सुनीताराजे पवार हे मान्यवर उपस्थित होते.

‘जनावरे हसू शकत नाहीत, माणसे हसू शकतात, पण ती हसत नाहीत. हसून जीवनाचा रसरशीत आस्वाद घेतला पाहिजे’,  असे प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविकात सांगितले.

शि. द. फडणीस
‘मन, शरीर तंदुरुस्त करण्यासाठी विनोद उपयुक्त ठरतो. मात्र,एकच व्यंगचित्र वेगवेगळ्या वयोगटात वेगवेगळा संदेश देते. वेगवेगळ्या रितीने पोचते. त्याचा आस्वाद घेणे जमले पाहिजे.विनोद लेखन, व्यंगचित्रकला क्षेत्रात महिला कमी आहेत, पण मंगला गोडबोले यांचा आदर्श ठेवून ही संख्या वाढली पाहिजे’, अशी अपेक्षा शि. द. फडणीस यांनी व्यक्त केली.

मंगला गोडबोले म्हणाल्या, ‘विनोदाचं गाडं घरंगळत चाललं आहे. विनोदाचे मर्म म्हणजे तो योग्य ठिकाणी थांबला पाहिजे. हल्ली विनोदी लेखनाचीच अतिरेकी मागणी होते आहे का ? असा प्रश्नही पडतो. माणसांना विचार करायचा नाही, म्हणून सतत करमणुकीची मागणी होते का, याचाही विचार केला पाहिजे. आमचे जीवन स्ट्रेसफुल आहे, अशी तक्रार आमची पिढी करते. ही सबब चुकीची असून, ताण नको असेल तर रेसमध्ये धावणे थांबवले पाहिजे.जिथे तिथे हलक्या फुलक्या वातावरणाची अपेक्षा ठेवणेही योग्य  नाही.जुन्या कोटया असलेला विनोद, कृत्रिम विनोद घडवणारे लेखन, सहजता गमावलेला विनोद , बाल बुध्दीचा विनोद सध्या दिसत आहे. हास्यामुळे आयुष्यातील आशावाद वाढतो. तरीही विनोदाला दुय्यम स्थान दिले जाते.विनोदाला सांस्कृतिक प्रतिष्ठा दिली पाहिजे.’

‘विनोदी लेखकांनी  स्पर्धत उतरून उत्स्फूर्त लेखन हरवू देऊ नये. विनोदातील  ‘वि’ हा शब्द विवेकातही आहे, हे व्यावसायिक विनोदकारांनी लक्षात ठेवले पाहिजे. कान धरणारेही कोणी उरले नाही. वाहिन्यांवरचा विनोद आवडला नाही, तर दोन ओळीचा निषेधही व्यक्त होत नाही’, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

प्रदीप बर्गे यांनी सूत्रसंचालन केले. मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमाला हजर होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZWHBO
Similar Posts
‘मसाप’तर्फे विनोद-साहित्य-आनंद मेळा पुणे : ‘महाराष्ट्र साहित्य परिषद आणि लायन्स क्लब औंध-पाषाण यांच्या सयुंक्त विद्यमाने जागतिक हास्यदिनाच्या निमित्ताने विनोद-साहित्य-आनंद मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सहा मे रोजी सायंकाळी ५.३० ते आठ या वेळेत एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात होणार आहे,’ अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा
सावरकर कुटुंबावर आधारित ‘त्या तिघी’ एकपात्री प्रयोगाला प्रतिसाद पुणे : स्वातंत्र्यसंग्रामातील सावरकर कुटुंबियांच्या घरातील बंधू त्रयीच्या पत्नींचे योगदान मांडणाऱ्या त्या तिघी' या डॉ. शुभा साठे लिखित कादंबरीवर आधारित ‘त्या तिघी...स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा’ या एकपात्री प्रयोगाला पुणेकर रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
पुलंच्या स्मृतिदिनानिमित्त बिल्हण संगीतिकेचे आयोजन पुणे : अवघ्या महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. १२ जून हा पुलंचा स्मृतिदिन. यानिमित्त पु. ल. कुटुंबीय, कोहिनूर ग्रुप प्रस्तुत आशय सांस्कृतिक आणि स्क्वेअर वन यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी नऊ ते ११ या वेळेत ‘एक पुलकित सकाळ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी
‘मसाप’चा रेखा ढोले पुरस्कार जाहीर पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) पुणे आणि राजहंस प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राजहंस’च्या एक अभिन्न सदस्य आणि राजहंस प्रकाशनाच्या पुस्तक निर्मितीच्या कार्याचा अविभाज्य घटक असलेल्या श्रीमती रेखा ढोले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘मसाप’तर्फे साहित्यक्षेत्रासाठी पुरस्कार दिले जातात. या वर्षी मराठी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language